पुणे येथील ‘पोर्श’ अपघात प्रकरणानंतर महाराष्ट्रातील ठिकठिकाणी अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचं सत्र जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे, ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदार अशा अनेक ठिकाणी असलेल्या अनधिकृत पब, बारवर संबंधित महापालिकेकडून हातोडा टाकला जात आहे. यासंदर्भात अभिनेता सौरभ गोखलेनं एक चपखल अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला सौरभ गोखले सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सौरभ नेहमी आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर परखड मत मांडत असतो. सध्या अनेक महापालिका अनधिकृत पब व बारची झाडाझडती घेऊन कारवाई करत आहेत. यावरही सौरभनं आपल्या अनोख्या शैलीत, पण चपखल अशी पोस्ट शेअर केली आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

aditya sarpotdar
हिंदीप्रमाणे मराठी चित्रपट का पुन्हा प्रदर्शित केले जात नाहीत? ‘मुंज्या’चा दिग्दर्शक कारण सांगत म्हणाला…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…

हेही वाचा – Video: सुहाना खान कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदाबरोबर दिसली नाइटक्लबमध्ये पार्टी करताना, व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेता सौरभ गोखले इन्स्टाग्राम स्टोरीवर व्यक्त झाला आहे. या स्टोरीमध्ये त्यानं लिहिलं आहे, “शहरातील अनेक अनधिकृत पब आणि बारवर महापालिकेची कारवाई!!…पण हे अनधिकृत बार आणि पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिलं त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?” अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

याआधी सौरभनं सोशल मीडियावर “all eyes on rafah” या आशयाचे स्टेटस टाकणाऱ्यांची खिल्ली उडवली होती. “स्वतःच्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आमचं स्टेटस मात्र ‘all eyes on rafah,’” अशी पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर केली आहे.

हेही वाचा – ‘सिंधूताई माझी माई’नंतर किरण माने झळकणार ‘या’ नव्या मालिकेत, म्हणाले, “अत्यंत निर्दयी, क्रूर…”

दरम्यान, सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं मराठी मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका निभावल्या होत्या. एवढंच नव्हेतर त्यानं आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतही उमटवली आहे. तसंच सौरभ मराठी रंगभूमीवरही अविरत काम करत आहे. सध्या त्याचं प्रदीप दळवी लिखित व विवेक आपटे पुनदिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकात त्यानं मुख्य नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यात सौरभसह आकाश भडसवाळे, चिन्मय पाटसकर, अमित जांभेकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्नील कुलकर्णी, गौरव निमकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

Story img Loader