छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचं शिवधनुष्य समर्थपणे पेलणारा अभिनेता शरद केळकरचा आज वाढदिवस. रुबाबदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज आणि उत्तम अभिनय असा सर्वांगीण कलाकार असणाऱ्या शरदचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. मराठीसह देशभरात आपल्या कामाची छाप उमटवणाऱ्या शरदच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.

शरद केळकरने बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत अभिनय केला आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर त्याचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे. शरद केळकरचा जन्म ७ ऑक्टोबर १९७६ रोजी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी झाला. त्याचे संपूर्ण शिक्षणही मध्यप्रदेशात झाले आहे. यानंतर एमबीए करण्यासाठी त्याने ग्वाल्हेरच्या प्रेस्टीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शरद केळकरने एका महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम केले.
आणखी वाचा : “आता आमच्यात प्रेम…” अमृता खानविलकरचे पती हिमांशूबरोबरच्या नात्याबद्दल थेट वक्तव्य, म्हणाली “ते रिलेशन…” 

dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
pune mahametro loksatta news
‘महामेट्रो’कडून हवाईप्रवाशांसाठी विशेष सुविधा, कसा होणार फायदा?
raigad beaches crowded with tourists
रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे महाराष्ट्रात! ‘या’ गावातील शेतकरी आहेत कोट्याधीश अन् लक्षाधीश
gold prices
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठे बदल… ग्राहकांची चिंता…
bahiram yatra festival
प्रसिद्ध बहिरम यात्रेला सुरुवात! काय आहे परंपरा आणि इतिहास?

शरद केळकरला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत शरद केळकरने त्याच्या संघर्षाबद्दल भाष्य केले होते. “मी पहिल्यांदा सुट्टीसाठी मुंबईमध्ये एका चुलत भावाच्या घरी राहायला आलो होतो. त्याचदरम्यान एका फॅशन शोसाठी मला फोन आला. वांद्रे येथे एका रुममध्ये आम्ही नऊ मुलं एकत्र राहायचो. तिथेच एक राजस्थानी हॉटेल होतं. दोन रुपये एक पोळी आणि अंडं मिळायचं. मी थोड्या दिवसांनी धडपड करुन एका गॅस सिलेंडरची व्यवस्था केली. सकाळी चार अंडी व दोन पोळ्या तसेच परत संध्याकाळीही माझं हेच जेवण असायचं. २५ रुपयांमध्ये मला हे मिळायचं”.

सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये स्वतःचा खर्च निघावा म्हणून मी जीम ट्रेनर म्हणून काम केलं. जीम ट्रेनर म्हणून काम करत असताना मला २७५० रुपये पगार होता. एका फॅशन शोसाठी फक्त तीन मिनिटं चालायचं होतं. त्या तीन मिनिटांसाठी मला पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार होतं. मी लगेचच ती ऑफर स्वीकारली. यानंतर जेव्हा छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्या हाती पैसे येऊ लागले. फोटोशूट किंवा एखाद्या जाहिरातीमध्ये काम मिळाल्यानंतर थोडे फार पैसे मिळायचे. पण छोट्या पडद्यापासून त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

आणखी वाचा : “बाबांनी डोळे फिरवले, तोंडातून फेस येत होता अन्…” प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “त्यांची नस…”

शरद केळकरने २००४ मध्ये दूरदर्शनच्या आक्रोश या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर शरद केळकरने अनेक टीव्ही शोचे सूत्रसंचालन करताना दिसला. तो ‘सीआयडी’, ‘उतरन’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ यांसह अनेक मालिकांमध्ये दीर्घकाळ काम करताना दिसला. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्याने विविध चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या.

शरद केळकर हा ‘गोलियो की रसलीला : राम-लीला’ या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटात त्याचे पात्र काही मिनिटांचे असले तरी त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कालांतराने भारदस्त आवाज ही त्याची मुख्य ओळख बनली आहे. शरद केळकरने बाहुबली या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आपला आवाज दिला होता.

आणखी वाचा : “तुझा कधीही न पाहिलेला फोटो आहे का?” सोहम बांदेकर म्हणाला “माझ्याकडे माझा…”

शरद केळकर हा दिल्लीतील चोर बाजारातून कपडे विकत घेऊन ते घालायचा. एका मुलाखतीत त्याने याबद्दलचा किस्सा सांगितला. दिल्लीतील चोर बाजार हा ब्रँडेड शूज आणि स्वस्त कपड्यांसाठी ओळखला जातो. कॉलेजच्या काळात मी तिथून खरेदी केली. मी ग्वाल्हेरचा आहे आणि मी तिथे क्रीडा महाविद्यालयात होतो. त्यावेळी माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. यामुळे, सुट्टीच्या दिवशी आम्ही चोर बाजारातून ब्रँडेड शूज खरेदी करण्यासाठी दिल्लीला यायचो. रात्रभर प्रवास करायचा आणि सरळ चोरांच्या बाजारात जायचं. खाण्यासाठी करीमच्या दुकानात थांबायचो, असे शरद केळकरने म्हटले.

शरद केळकरने २०२० मध्ये तान्हाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्याने यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या या चित्रपटातील कामगिरीचे प्रचंड कौतुकही झाले. शरद केळकरने लक्ष्मी या चित्रपटात तृतीयपंथीयांची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता लवकरच तो तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. शाळेतील एक क्रीडा शिक्षक ते हिंदीसह मराठीतील प्रसिद्ध अभिनेता हा त्याच्या प्रवास प्रचंड कौतुकास्पद आहे.

Story img Loader