अभिनेते शरद पोंक्षे आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या परखड विचारांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराशी सामना करून त्यावर मात केली. नुकतंच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये पोंक्षे यांनी आपल्या कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितलं. कशाप्रकारे शरद पोंक्षे यांनी या जीवघेण्या आजाराबरोबरची लढाई जिंकली वाचा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पोंक्षे म्हणाले की, “कुठलंही संकट असो, शारिरीक, मानसिक किंवा आर्थिक हे पहिलं स्वीकारायला शिका. आपण स्वीकारत नाही, स्वीकारायलाच खूप वेळ घेतो. मग त्याच्यामध्ये मार्ग सापडायला अजून पुढे वेळ जातो. मी दुसऱ्या दिवशी स्वीकारलं, मला कॅन्सर झालाय. डॉक्टरांनी सांगितलं, ५० टक्के जगणार ५० टक्के मरणार. जर काही चमत्कार झाला तरच जगणार. सामान्य माणूस आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकली. अरे बापरे ही काय भानगड झाली? हा एक रात्र विचार केला. पण दुसऱ्या दिवशी स्वीकारलं. डॉक्टर म्हणाले चलो, लढते है अभी. आता काय-काय करायचं आहे ते सांगा. माझा आध्यात्मावर विश्वास आहे. त्यामुळे घरात गेल्यावर आध्यात्मिक काय-काय करू शकतो? आयुर्वेदात काय-काय उपचार आहेत? हे सगळं शोधायला सुरुवात केली. मैदानात उतरलो आहे, तर आता लढायचं आहे. लढण्यापूर्वी पहिले शस्त्र काय-काय आहेत? मग घोड्यावर बसून लढायला जायचं आहे? की बाईकवर बसून जायचं आहे? रणगाड्यात बसून जायचं आहे की कसं? माझ्याकडे उपलब्ध काय-काय आहे? तर माझ्याकडे एवढे-एवढे पैसे आहेत हे पाहून बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. सुई, उपचार तेच असतात. उगाच ते दाखवायला असतं की, इंग्लंडला जाऊन मी उपचार घेतले. त्याची काही गरज नाहीये. कुठल्याही जगातील इतर देशात जायची गरज नाहीये. भारतामध्ये मुंबई शहरात जगातील सर्वोत्तम उपचार मिळतात. जगातील सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनिअर आपल्या देशात आहेत.”

हेही वाचा – Video: पावभाजी आणि फूड ट्रकनंतर आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रिया पाठारे लवकरच घेऊन येतायत…

पुढे पोंक्षे म्हणाले की, “हे सगळं झाल्यावर पहिला वेळ कशात जातो? तर मलाच का झालं? मी कोणाच काय वाकडं केलं? हा स्वतःबद्दलचा खूप मोठा गैरसमज आहे. प्रत्येकाला असं वाटतं असतं की, मी कोणाचं काय वाकडं केलं नाही. मी कोणाशी काही वाईट वागलो नाही. खूप वाईट आणि घाणेरडे वागले असतात. अनेकाच कळत-नकळत खूप वाटोल केलेलं असतं. पण मात्र स्वतःला सांगत असतो की, मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. मग माझ्याच वाट्याला का आलं? हे माझे भोग आहेत. कधीतरी मी कोणाशी वाईट वागलो असेल. कुणाला तरी दुखावलं असेल. त्या सगळ्याचे परिणाम आता माझे मला आलेले आहेत. म्हणून शिक्षा भोगून संपवू या, हे स्वीकारा.”

हेही वाचा – Sahkutumb Sahparivar: “…तर आम्ही सगळे त्याला पोकळ बांबूचे फटके देणार”; असं अवनी वैभवला का म्हणाली?

“खरी लढाई माणूस मैदानात जिंकत नाही, तर स्ट्रॅटेजीमध्ये जिंकतो. लढायला उतरण्याच्या आधीची रात्र असते ना. काय करायचं आहे? कशा पद्धतीने लढायची आहे? समोरचा शत्रू कोण आहे? शिवाजी महाराजांकडे काय होतं? ५ लाख औरंजेबाच्या सैन्यासमोर ५-१० हजार सैन्य घेऊन ते लढायचे. जिंकायचे का? तर स्ट्रॅटेजी. स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या बुद्धीमत्तेवर विश्वास, स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास म्हणूनच त्याच्यातून ते बाहेर आले ना. एकदम समोरासमोर गेलो तर आपण नाही जिंकू शकणार. मग बिळातून बाहेर याचं आणि लढायचं. यातून गनिमी कावा निर्माण झाला. परिस्थितीतून मार्ग काढला. बाजीराव पेशवे का नाही एकही लढाई हरले? हरू शकले असते समोरासमोर लढले असते पण नाही. लढाई लढायच्या अगोदरची स्ट्रॅटेजी ठरवणं फार महत्त्वाचं आहे,” अशी उदाहरण देत शरद पोक्षें यांनी पुढे आपल्या कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितलं.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

“आता माझी लढाई कोणाशी आहे, कॅन्सरीबरोबर आहे. तो बरा न होणारा आहे. पण त्याला मी बरा करतो. शरीरात आणि आयुष्यात बदल काय-काय होऊ शकतात. तर मग आर्थिक गणित बिघडणार आहे. पुढील वर्षभर मी एकही रुपया कमवणार नाहीये. घरात कोणी कमवणार नाहीये. आर्थिक परिस्थितीत काय-काय करावं लागेल. इकडे काय करावं लागेल तिकडे काय करावं लागेल, अशा सगळ्या लढायांचा विचार केला गेला. पाच-सहा दिवस घेतले आणि मग उभा राहिलो. बॉम्बे हॉस्पिटलच्या इथे टॅक्सीतून उतरलो अन् म्हंटलं चलो. गेलो १० मजल्यावर लाव ऑक्सिजन म्हंटलं, झालं. म्हणून मी कॅन्सरची लढाई जिंकलो. जर सेनापती उभा राहिला ना मग प्रत्येकजण त्याच्यासाठी लढायला उभा राहतो. तशी माझी बायको. मनापासून जे काही आध्यात्मिक आहे, ते माझ्यासाठी करायला लागली. माझी मुलं बापासाठी जे काही करू शकता, ते करायला तयार झाली. माझ्या आईने अथर्वशीर्ष मंत्र उपचार सुरू केले. मग तुळस आण, कडुलिंबाचा पाला आण, ते सगळं मिक्स करू रोज सकाळ-संध्याकाळ द्यायला सुरू केलं.”

हेही वाचा – ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘या’ भूमिकेत दिसणार किरण माने; म्हणाले, “खूप वर्षांनी…”

पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, “मग केस गेले. विचित्र केस झाले. माझे एवढे सुंदर, घनदाट आणि मस्त केस होते. पण आता ते गेले परत तर कधी येणार नाहीत. मग काय करायचं? याच्यावर मार्ग काढू या म्हंटलं. दोन-चार विग मेकर्सना विचारलं, ते पण काही व्यवस्थित सांगेना. आलेले थोडेफार काही केस आहेत, ते पण नीट होईना. मग मुलगा म्हणाला, बाबा अंधेरीला हेअर रिन्यूएशनचा चांगला स्टुडिओ आहे, तिथे जाऊन बघू या. मग तिथे गेलो. ते बांगलादेशी मुलगी चालवते. ती म्हणाली, मी करून देते. तिनं मला हा विग बनवला. हा विग आहे, हे मला सांगायला काही लाज वाटत नाही. त्यात लपवायच काय? खोटं वागायचंच नाही. काही गरजच नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sharad ponkshe share cancer battle experience pps