‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक महिला आणि पुरुष या चित्रपटाबद्दल गप्पा मारताना दिसत आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षेंनी सुकन्या मोनेंच्या सासऱ्याची भूमिका साकारली आहे. नुकतंच त्यांनी या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या टीमने नुकतंच यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी केदार शिंदेंनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट कसा पाहिला आणि त्याचं कास्टिंग कसं झालं, याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

“जेव्हा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हिट ठरला, त्यावेळी मी इंग्लंडमध्ये होतो. मी तिथून आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तिकीट काढलं आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. माझा मुलाने मला म्हटलं, ‘बाबा मास्क लावून चलं.’ त्यावेळी मी त्याला म्हणालो, ‘अजिबात गरज नाही. हा चित्रपट पाहिल्यानतंर मला तिथे पाहिल्यावर कोणीही ओळखणार नाही.’

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही तरी उतार चढाव येतात. माझ्या आयुष्यात २०१९ हे वर्ष हे कठीण होतं. मला तेव्हा कर्करोगाने ग्रासलं होतं. त्या काळात मला मराठी सिनेसृष्टीतील काहींनी फोन केला. यातील एक म्हणजे केदार शिदे आणि दुसरा म्हणजे महेश मांजरेकर. मी आजारपणात होतो आणि केदार म्हणाला, “लवकर बरा हो, तुझ्यासाठी एक भूमिका ठेवली आहे”, जेव्हा तुम्हाला एखादा दिग्दर्शक असं म्हणतो, तेव्हा हा विश्वास फार महत्त्वाचा असतो”, असे शरद पोंक्षे म्हणाले.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

“मी आजारपणातून बरा होऊन एक महिनाही झाला नव्हता आणि तेव्हा मी तो चित्रपट शूट केला. त्यामुळे त्या चित्रपटात मी असा दिसतोय. मी त्या अण्णांच्या भूमिकेसाठी वर्षभर मेहनत केली, असंच लोकांना वाटतंय. पण तसं काहीही नाही.”

“बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी महिलांनी तुडूंब गर्दी केली. एकीकडे आपण मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक येत नाही, असं म्हणतो. तर दुसरीकडे या चित्रपटामुळे अनेक महिला ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच चित्रपटगृह पाहिलं नव्हतं, त्यांनी तिकीट काढून चित्रपट पाहिला. हीच ताकद या चित्रपटात आहे, असं मला वाटतं. केदारने या चित्रपटात महिल्यांच्या अनेक लहान लहान भावना टिपल्या आहेत. यामुळे पुरुषांनाही चित्रपट बघताना रडावसं वाटतं”, असेही शरद पोंक्षेंनी सांगितले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sharad ponkshe talk about baipan bhari deva movie cast cancer kedar shinde nrp
Show comments