अभिनेते शरद पोंक्षे नेहमी त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत असतात. मराठी मनोरंजनसृष्टीत बेधडक व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. सध्या त्यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतं असतात. नुकतंच त्यांनी चाळसंस्कृतीविषयी भाष्य केलं आहे. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून तोही व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची सर्वात आवडती गोष्ट माहितेय? जाणून घ्या

How to look at Manusmriti and the Caste System
Manusmriti and the Caste System मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेकडे कसे पाहावे? देवदत्त पट्टनायक यांच्यासह भारतीय संस्कृती आणि कलेचा घेतलेला आढावा!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article about contribution of pune in the field of sports
क्रीडासंस्कृती रुजली, पण…
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
The need for a culture that recognizes the meaning of the words Nidhipati and Representative
‘निधिपती’ – ‘प्रतिनिधी’ या शब्दांचा अर्थ ओळखणाऱ्या संस्कृतीची गरज
Dnyaneshwar, Ratnagiri, California,
रत्नागिरी कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर; समाजात ज्ञानेश्वरांबरोबर विज्ञानेश्वरही हवेत – ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर
mpsc mantra loksatta
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा – प्राकृतिक भूगोल
dombivali dahihandi celebration
सण..संस्कृती आणि पुढची पिढी!

या व्हिडीओत, शरद पोंक्षे चाळीतल्या गमतीजमती सांगताना दिसत आहे. ते म्हणतात की, “आमच्या घरी माझ्या वडिलांना पहिला बोनस मिळाला होता तेव्हा घरी फ्रिज आणला होता. आमचं दूध सोडून चाळीतल्या १०-१२ लोकांचं दूध त्या फ्रिजमध्ये असायचं. काकू जरा दूध ठेवतो हा, नासेल ना म्हणून. आतापर्यंत फ्रिज कोणाकडेच नव्हतं, तेव्हा नासलं नाही कोणाचं. पण आमच्या आई-वडिलांनी कधीच नकार दिल्याचं मला आठवत नाही. एकवेळ आई म्हणायची, आपलं दूध बाहेर काढून ठेव. पण काकूंच दूध आतमध्ये ठेव. ही जी माणूसकी होतीना ती आता फ्लॅटमध्ये हरवली आहे. समोर मेला तरी कोणी दरवाजा उघडून बघत नाही.”

हेही वाचा – अपूर्वा नेमळेकरला अजूनही येत आहे शेवंताची आठवण; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “या भूमिकेशी…”

हेही वाचा – शुभांगी गोखले लेक आणि जावयासह पोहोचल्या खास मैत्रिणीच्या घरी; फोटो शेअर करत सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “तुम्हाला सोडणारच…”

यापूर्वी शरद पोंक्षेंचं व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर केलेलं स्पष्ट मत चांगलंच चर्चेत आलं होतं. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. लवकरच पोंक्षे यांचं बहुचर्चित नाटक ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे पुन्हा एकदा रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. तसेच ते ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत झळकणार आहेत.