अभिनेते शरद पोंक्षें हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. कधी राजकीय भूमिकेमुळे तर कधी त्यांच्या अभिनयामुळे ते प्रसिद्धीझोतात असतात. नुकतंच शरद पोंक्षे यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून एक्झिट घेतली. मालिकेसाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही, असे कारण देत त्यांनी या मालिकेला रामराम केला. त्यानतंर लगेचच शरद पोंक्षेंनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

शरद पोंक्षे लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ असे या चित्रपटाचे नावर आहे. यादरम्यानचा एक खास व्हिडीओ शरद पोंक्षेंनी जाहीर केला आहे. यात त्यांच्या पहिल्या लूकची झलकही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला शरद पोंक्षेंचा रामराम, कारण आले समोर, म्हणाले “माझ्या जागी…”

Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

“स्वरगंधर्व सुधिर फडके सिनेमाचा मुहूर्त सोहळा. मी डॉ हेडगेवार साकारतोय व मित्र सुनिल बर्वे सुधिर फडके”, असे त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : केदार शिंदेंचा ‘तो’ फोन, कर्करोग अन्…, शरद पोंक्षेंनी केला ‘बाईपण भारी देवा’मधील भूमिकेबद्दल खुलासा; म्हणाले “मला कोणीही…”

स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात शरद पोंक्षे डॉ हेडगेवार ही भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या मुहुर्तावेळी त्यांनी त्यांच्या लूकची झलक दाखवली. यावेळी त्यांनी धोती, सदरा, कोट आणि टोपी परिधान केली होती.

शरद पोंक्षेंच्या या नव्या लूकवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांना हा लूक आवडल्याचे दिसत आहे. वाह…. असं वाटलं जणू प्रत्यक्ष संघाचे आद्यसरसंघचालक श्री हेडगेवार गुरुजी उभे आहेत , असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. तर एकाने दादा तुम्हाला डॉ. हेडगेवार ह्यांच्या भूमिकेत बघायला उत्सुक आहोत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अशी कमेंट केली आहे.

Story img Loader