मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरला ओळखले जाते. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. शशांक केतकर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी शशांकने पैसे थकवल्याप्रकरणी आवाज उठवला होता. त्यानंतर आता शशांकने त्याच्याबरोबर झालेल्या एका घोटाळ्याबद्दल सांगितले आहे.
शशांक केतकरने नुकतंच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्याबरोबर झालेल्या एका घोटाळ्याबद्दल सांगितले आहे. तसेच याप्रकरणी त्याने संबंधित प्रशासनाला जाबही विचारला आहे.
आणखी वाचा : प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने थकवले पैसे, शशांक केतकरचा आरोप, म्हणाला “मोठ्या कलाकारांना…”
“मी २०१३ मध्ये त्याने मीरा रोडमध्ये एका घराची नोंदणी केली होती. आता त्याला १० वर्ष उलटली आहे. पण १० वर्षात एकही वीट माझ्या मालकीची झालेली नाही”, अशी खंत शशांकने व्यक्त केली आहे.
“इथे बिल्डरला काही मजल्यांची परवानगी मिळाली होती. त्यावर त्याने दहा-वीस मजले बांधले आहेत. मीरा रोड शहरात वीस- वीस मजली इमारत उभी राहते आणि ती कोणाच्या नजरेस पडत नाहीत?” असा सवाल शशांकने उपस्थित केला आहे.
आणखी वाचा : “रोजचं घर चालवण्यासाठी…”, शशांक केतकरने सांगितलं मालिका करण्यामागचं खरं कारण
“इतकंच नाही तर चित्रपटसृष्टीतही अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागते, असे शशांकने म्हटले आहे. “आम्ही असा सिनेमा देऊ, अशी भूमिका देऊ अशी आमिष दाखवायची. काम पूर्ण करुन घ्यायचे. पैसे पुढच्या टप्प्याचे असतात ते द्यायचेच नाही, फोन उचलायचेच नाही. कारण सांगत राहायची, हाही एक घोटाळाच झाला. खऱ्या आयुष्यात आम्ही अशा घोटाळ्यांचा सामना करत असतो”, असेही शशांकने म्हटले.