‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी शशांकने पैसे थकवल्याप्रकरणी आवाज उठवला होता. आता शशांकने पुन्हा एकदा पैसे थकवल्याप्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे.

शशांकने नुकतंच फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याचे पैसे थकवल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला प्रोड्युसर का म्हणतो आपण, असा प्रश्नही शशांकने उपस्थित केला आहे.
आणखी वाचा : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका का सोडली? अतिशा नाईकने सांगितलं खरं कारण, म्हणाली “मला पश्चाताप…”

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

शशांक केतकरची पोस्ट

“मी आणखी एका फसव्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम केले आहे. ज्याने मला माझ्या कामाचे X, xx, xxx लाख रुपये देण्याचे वचन दिले होते आणि त्यांनी दिलेले काम मी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्ण केले आहे…. (डबिंग वगळता)

गेल्या अनेक महिन्यांपासून मी या फसव्या प्रोडक्शन हाऊसबद्दल पाठपुरावा करत आहे आणि ते लोक मला प्रत्येकवेळी फक्त विविध कारणं देत आहेत. मी एका मराठी चित्रपटाबद्दल बोलत आहे, ज्यात सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी काम केले आहे. त्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या देय रकमेची वाजवी टक्केवारी आधीच देण्यात आली आहे. पण मला आणि त्याच टीममधील इतर अनेकांना २० टक्के रक्कमही मिळालेली नाही.

माझ्या आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या संवादाचे सर्व तपशील योग्य वेळी न्यूज आणि मीडिया चॅनेलशी शेअर केले जातील.

गमतीचा भाग हा आहे की एखाद्याकडे अॅक्टिंग स्किल्स नसतील तर त्याला आपण अभिनेता म्हणत नाही… मग ज्याच्याकडे पैसा नाही त्याला प्रोड्युसर का म्हणतो आपण”, असे शशांक केतकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “…तर माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडले असते”, रंगावरुन होणाऱ्या भेदभावावर मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या “गोरं व्हायचं क्रीम…”

दरम्यान शशांक केतकरने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तसेच सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

Story img Loader