नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी लाखो भारतीय विदेशी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे परदेशी गेलेल्या भारतीयांना देशातील स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी जगभरातील विविध भागांत इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये पदार्थांच्या किमती निश्चितच जास्त आहेत परंतु हे पदार्थ बनवणाऱ्या शेफनाही चांगले मानधन दिले जाते. या संदर्भात मराठी अभिनेता शशांक केतकर याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी एक मुलगा थेट बाल्कनीत घुसला अन्…

शशांक केतकर सध्या इंग्लंडमध्ये भ्रमंती करीत आहे. इंग्लंडमध्ये फिरत असताना शशांकने हौन्सला वेस्ट या भागातील एका रेस्टॉरंटचा व्हिडीओ शेअर केला आहे. हौन्सला वेस्ट भागातील मद्रास फ्लेवर्स नामक रेस्टॉरंटमध्ये डोसा शेफची आवश्यकता आहे. या रेस्टॉरंटने डोसा शेफला वार्षिक २८ हजार पौंड पगार ऑफर केला आहे. वार्षिक २८ हजार पौंडची सध्या भारतीय रुपयाप्रमाणे २८ लाख ६३ हजार १६ रुपये एवढी किंमत आहे. त्यामुळे शशांक केतकर व्हिडीओ शेअर करीत आपल्या चाहत्यांना म्हणाला, “तसे माझे बरे चालले आहे पण, काय म्हणता मग व्हायचे का शिफ्ट?” यावर त्याच्या चाहत्यांनी विविध कमेंट्ससुद्धा केल्या आहे.

हेही वाचा : सुकन्या मोनेंनी क्रांती रेडकरची केली हुबेहूब नक्कल! व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

शशांक केतकरच्या या व्हिडीओवर एका गृहिणीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, “घरी डोसे बनवून काही मिळत नाही, तिथे आमच्यासाठी काही होतेय का बघा” तर काही युजर्सनी मजेशीर कमेंट करीत उगाच लहानपणी शिक्षण घेतले; त्यापेक्षा डोसे बनवायला शिकले पाहिजे, असे लिहीत इंग्लंडमध्ये डोसा शेफला मिळणाऱ्या पगारावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar share video of indian restaurant in england sva 00