मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. शशांक केतकर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने चित्रपटाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

शशांक केतकरने नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मालिकांमध्ये काम करण्याबद्दल भाष्य केले. यावेळी त्याला मालिकांमध्ये कपड्यांसाठी, जेवणासाठी, शिफ्टसाठी झगडावं लागत असताना तू टीव्हीवर कसा रमतोस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
kareena kappor saif ali khan omkara
स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास शो, पण घडलं उलट; किस्सा सांगत म्हणाली…

“मला टीव्हीवर मालिकांमध्ये काम करायला आवडतं. माझं ते प्रेम आहे. मला हा ताण घेऊन काम करायला आवडतं. त्याबरोबरच मला नीट व्यवस्थित गोष्टी असताना काम करायलाही आवडतं. मला चित्रपटात काम करायलाही आवडतं. पण आपल्याकडे चित्रपट सतत मिळतील का, याची मला कोणतीही शाश्वती नाही. कारण शशांक केतकरचा चित्रपट ३०० रुपयांचं तिकीट काढून लोक का बघतील, त्याच ३०० रुपयात त्यांना ऋतिक रोशन दिसतोय.

दक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी मनोरंजनाचं साधन म्हणून फक्त त्यांचीच भाषा ठेवली आहे. आपल्याला हिंदी पण येतं, इंग्रजीही येतं आणि मराठी येतेच. त्यामुळे आपण निवड करतो. ३०० रुपयात एखादा गहन चित्रपट पाहण्यापेक्षा मी वरुण धवनचा एखादा धमाल, टाईमपास असा चित्रपट बघेन. एक प्रेक्षक म्हणून हा विचार लोकांच्या डोक्यात येणं सहाजिक आहे”, असे शशांक केतकरने म्हटले.

आणखी वाचा : “पेंग्विनची काय गरज…” शशांक केतकरने बस स्टॉपवरील ‘तो’ फोटो केला शेअर, कॅप्शन चर्चेत

दरम्यान शशांक केतकर हा सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत झळकत आहे. ‘होणार सून मी या घरची…’ या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. शशांक केतकरने मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्याने मराठी कलासृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. उत्तम नायक ते खलनायक अशा सर्वच भूमिका त्याने आतापर्यंत साकारल्या आहेत.