अभिनेता श्रेयस तळपदे हा गेली अनेक वर्षं मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी त्याने आवाज दिला होता. श्रेयस तळपदेने केलेल्या या कामाचं खूप कौतुक झालं. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.

श्रेय तळपदे हा पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ असे त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे हा प्रमुख भूमिकेत दिसणरा आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात माजी मुख्यमंत्री यांची पत्नी, कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावचे पती झळकणार चित्रपटात, नाव आले समोर

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स

राधिका कुमारस्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या व्यक्तिरेखेचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘अजाग्रत’ हा एक ॲक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटाची टॅगलाईन ‘अंधारामागील सावल्या’ अशी आहे. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. या चित्रपटाच्या टॅगलाईनमुळे या रहस्यमय चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

या चित्रपटात जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने केली आहे. चित्रीकरणस्थळ अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित होईल, असे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : “ट्रोल करुन टाईमपास करणाऱ्यांनो अकलेचे…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “फटाके वाजवून…”

या चित्रपटात माजी मुख्यमंत्री यांची पत्नी, कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांच्याबरोबरच सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. हा अभिनेता कोण, याची औत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘अजाग्रत’ हा चित्रपट हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader