मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रिय आहे. नुकतंच ते दोघेही युरोप ट्रीपवरुन परतले आहेत. सध्या ते दोघेही सोशल मीडियावर या ट्रीपचे खास फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. यातीलच एका फोटोमुळे तो चर्चेत आला आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे दोघेही नुकतंच युरोपला फिरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग यांसह विविध पर्यटनस्थळांचाही आनंद घेतला. याचे अनेक फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”
नुकताच सिद्धार्थने या ट्रिपमधील खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सिद्धार्थ हा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने त्याचे अर्धे शरीर हे वाळूने झाकल्याचेही दिसत आहे.
आणखी वाचा : “हे फोटो टाकणं…” पत्नीने अंघोळ करताना शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर सिद्धार्थ चांदेकरची कमेंट
“माझ्या बायकोने समुद्रकिनाऱ्यावर केलेली कलाकृती”, असे कॅप्शन सिद्धार्थने या फोटोला दिले आहे. त्यावर कमेंट करताना मितालीने मास्टरपीस असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “सॉरी भाई, माझे बजेट कमी…” नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर
दरम्यान सिद्धार्थ चांदेकर हा सध्या त्याच्या या ट्रीपबरोबरच आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे. सिद्धार्थ लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.