सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करीत, तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतो. अभिनेत्याचा असाच एक गमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा : “तुम्ही खाल्लेला विचित्र पदार्थ कोणता?”, अतुल कुलकर्णी म्हणाले, “बेडकाचे पाय अन्…”
सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तो इन्स्टाग्रामवरील सर्व फिल्टर (फोटो काढण्याचे ऑफ्शन) ट्राय करत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता आपल्या चाहत्यांना तोंड उघडून सर्व दात दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेता लिहितो, “मी माझ्यासाठी परफेक्ट इन्स्टाग्राम फिल्टर शोधत आहे.” तसेच, या कॅप्शनच्या शेवटी “हो रूट कॅनल झालंय” असे सिद्धार्थने नमूद केले आहे.
सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची एक दाढ काढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, “रागवू नकोस, पण तुझी दाढ योग्यवेळी लावून घे”, यावर सिद्धार्थ म्हणाला, “टाकलाय करायला…”
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/image-32.png?w=830)
हेही वाचा : “तिकीट काढून स्वत:चे चित्रपट पाहतोस का?” चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर; म्हणाला…
दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये, “तू पण दाढ काढली आहेस?” असे लिहित पुढे हसायचे इमोजी जोडले आहेत. यावर सिद्धार्थ म्हणाला, “अहो लय दुखत होती…” सिद्धार्थच्या व्हिडीओमध्ये अनेकांनी त्याने दाढ काढल्याचे पाहिले आणि त्या संदर्भात कमेंट करून त्याच्याकडे चौकशी केली. अभिनेत्यानेही बऱ्याच लोकांना स्वत: उत्तर देत लवकरात लवकर नवी दाढ रिप्लेस करेन असे म्हटले आहे. दरम्यान, आता लवकरच सिद्धार्थ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.