Siddharth Chandekar Nickname: ‘झेंडा’, ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘गुलाबजाम’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ चांदेकर सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. सिद्धार्थने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आता सिद्धार्थचा लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ असं चित्रपटाचं नाव आहे. त्यामुळे सध्या सिद्धार्थ खूप चर्चेत आला आहे. पण, मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थचं टोमण नाव तुम्हाला माहितीये का? तर जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकराचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला खास ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील कलाकारांनी ट्रॅक्टरमधून एन्ट्री घेतली होती. याच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात सिद्धार्थ चांदेकरच्या टोमण नावाचा खुलासा त्याची आई, अभिनेत्री सीमा चांदेकरांनी केला.

हेही वाचा – Bigg Boss 18: “आधी महाकालवर खूप विश्वास, नंतर धर्म बदलला…”, विवियन डिसेनाच्या अध्यात्माबाबत काम्या पंजाबीचं भाष्य, म्हणाली…

‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने सिद्धार्थच्या आईला विचारलं, “सिद्धार्थचं घरातलं टोपण नाव काय?” तेव्हा सीमा चांदेकर हसत म्हणाल्या, “सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना. तेव्हा टीव्हीवर ‘गोट्या’ मालिका सुरू होती. त्यामुळे सिद्धार्थचे आजोबा त्याला गोट्या म्हणायचे.”

हेही वाचा – Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”

हेही वाचा – Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या १० दिवसांआधी झालं ‘मिड वीक एविक्शन’, कमी मतांमुळे ‘हा’ सदस्य घराबाहेर

दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर अमेय वाघ, क्षिती जोग, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, मिताली मयेकर, राजन भिसे हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ पहिल्यांदाच पत्नी मितालीबरोबर काम करणार आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar nickname revealed his mother seema chandekar pps