बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी सिद्धार्थने एका मिनी बसबरोबर फोटो पोस्ट केला आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

“आता झिम्माच्या बायका परत एकदा फोटो बॉम्ब करणार, त्याआधी स्वतःचे बरे फोटो टाकून घेऊया. नाही का? बाकी teaser कसा वाटला?” असे कॅप्शन सिद्धार्थ चांदेकरने दिले आहे.

सिद्धार्थ चांदेकरचा हा फोटो क्षिती जोगने काढला आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे. “क्षिती जोग माझा फोटो नाही काढलास गं? असा प्रश्न विचारत रागात असल्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यावर क्षितीने हसत कमेंट केली आहे.

सायली संजीव कमेंट

आणखी वाचा : “आक्रोश, यातना आणि मग आत्महत्या…” मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “या लढ्यात…”

दरम्यान ‘झिम्मा २’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहेत. त्यांच्याबरोबरच आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघीही यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar share photo during zimma movie shoot sayali sanjeev comment nrp