मराठी मनोरंजनसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने आईच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. यात त्याची आई ही झोक्यावर निवांत बसल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला सिद्धार्थने छान कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “हे फोटो टाकणं…” पत्नीने अंघोळ करताना शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर सिद्धार्थ चांदेकरची कमेंट

“वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. कायम असंच निवांत बघायचंय तुला. कुठला विचार नाही, त्रास नाही. हातात एक कडक चहाचा कप आणि चेहऱ्यावर कधीही न उतरणारं हसू. बास!”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट

सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने सिद्धार्थच्या पोस्टवर कमेंट करत ‘काकू वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले आहे. तर मंजिरी ओकने ‘सीमा ताई, वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशी कमेंट केली आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा काकू’, असे क्षितीज पटवर्धनने म्हटले आहे. दरम्यास सिद्धार्थची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar special birthday wish to mother share instagram post with photo nrp