मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अमेय वाघचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी अमेयसाठी खास पोस्ट लिहून त्याला शुभेच्छा देत आहेत. यामधील सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने अमेय वाघला हटके पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकप्रिय दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी अमेय वाघचा सुंदर फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आमचे लाडके मित्र आणि स्वॅगवाले वल्टास अभिनेते अमीSSSर वाघ यांनी बड्डेच्या भरघोस शुभेच्छा”, असं समीर विद्वांस यांनी लिहिलं आहे. तसंच हेमंत ढोमेने देखील अमेयसाठी खास पोस्ट लिहिलं आहे. आगामी चित्रपटातील फोटो शेअर करत हेमंत ठोमेने लिहिलं आहे, “लव्ह यू प्रशू…माझ्या साध्या, भोळ्या, भाभड्या, डोळ्यात ससे असणाऱ्या निरागस सोनूला वाढदिवसाच्या फसक्लास शुभेच्छा.”

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

हेही वाचा – नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल

तसंच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने हटके अंदाजात अमेय वाघला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेयबरोबरचा फोटो शेअर करून त्याने लिहिलं आहे, “जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज संघटनेचे अध्यक्ष, ओंकार अनंताचे जावई, महागातली कॉपी पिणारे आणि सतत १ ते ३० आकडे मोजायला लावणारे अमेय वाघ…तुम्हाला वाढदिवसाच्या Excuse Me शुभेच्छा.”

हेही वाचा – ‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

दरम्यान, नव्या वर्षात अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात अमेय आणि सिद्धार्थ एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त क्षिती जोग, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे असे तगडे कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट २४ जानेवर २०२५ला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा जबरदस्त पोस्टर प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar special post share for amey wagh on his birthday pps