मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर. मराठीतील हे क्यूट कपल नेहमी चर्चेत असतं. २४ जानेवारी २०२१ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मोठ्या थाटामाटात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा पार पडला होता. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर सिद्धार्थमध्ये काय बदल झाले? जाणून घ्या…

हेही वाचा – सिद्धार्थ चांदेकर सावत्र वडिलांना बाबा नव्हे तर ‘या’ नावाने मारतो हाक; म्हणाला, “त्यांना मी हे नातं…”

paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा सिद्धार्थला विचारलं की, लग्नानंतर तुझ्यात काय बदल झाले? यावर अभिनेता म्हणाला, “माझ्या कपाटाच्या साइजमध्ये खूप बदल घडलेला आहे. तसंच मी आधी सतत काळजी, चिंता करणारा माणूस होतो. तर आता ते माझं सतत चिंता करण्याचं प्रमाण कमी झालंय. शांतता आली असं वाटतंय. याशिवाय मी माझ्या लग्नानंतर कामाकडे जास्त लक्ष देऊ लागलो. मिताली माझ्या करिअरसाठी अत्यंत लकी ठरली.”

हेही वाचा – शेजारचे मुद्दाम विचारायचे खोचक प्रश्न; सिद्धार्थ चांदेकर ‘तो’ काळ आठवत म्हणाला…

“आता माझ्या करिअरची गाडी धावतेय. नंतर ती हळू होईल, थांबेल किंवा बिघडेल. पण या आयुष्यात सुंदर बायका आहेत ना, यांच्यामुळे मला माहितीये की, परत एकदा मी तो वेग घेणार, ती गाडी परत जोरदार धावणार. मला आता थांबेल किंवा बिघडेल या गोष्टींची भीती नाहीये. महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर मला अपयशी होण्याची भीतीच वाटतं नाही. कधी ना कधीतरी अपयश येणारचं आहे. मात्र अपयश येऊ नये यासाठी माझे हात आताच थरथरत नाहीयेत. मला अपयश आलं तर तेव्हा जे काही दुःख होईल, त्रास होईल या सगळ्याला मी सामोर जाऊ शकतो. मी खूप हसत-खेळत असं नाही म्हणणार. पण मी सामोर जाऊन पुन्हा कमबॅक करेन. लग्नानंतर ही माझ्यात शक्ती आली आहे,” असं सिद्धार्थ म्हणाला.

Story img Loader