मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सध्या तो ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने एका मिनी बसबरोबर फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने “आता झिम्माच्या बायका परत एकदा फोटो बॉम्ब करणार, त्याआधी स्वतःचे बरे फोटो टाकून घेऊया. नाही का? बाकी teaser कसा वाटला?” असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “प्राजक्ता माळीचं तिथे असणं…”, गौरव मोरेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
या फोटोला कॅप्शन देताना त्याने झिम्मा २, कबीर, सिद्धार्थ चांदेकर, रियूनियन, वॉव हेमंत सर असे हॅशटॅगही दिले आहेत. यातील “वॉव हेमंत” सर या हॅशटॅगमुळे सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. यावर अभिनेता हेमंत ढोमेने कमेंट केली आहे.
“अरे पण यात वॉव हेमंत सरची काय गरज आहे??? कुठून बोललो असं झालंय”, अशी कमेंट हेमंत ढोमेने केली आहे. त्यावर सिद्धार्थने हा हॅशटॅग माझ्यासाठी लकी आहे. तो असायलाच पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर हेमंतने एक इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
![siddharth chandekar hemant dhome comment](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/10/siddharth-chandekar-hemant-dhome-comment.jpg?w=498)
आणखी वाचा : “आता झिम्माच्या बायका परत…”, सिद्धार्थ चांदेकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, सायली संजीव रागात म्हणाली…
दरम्यान सिद्धार्थ आणि हेमंतच्या या कमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करताना वॉव हेमंत सर नक्की आहे तरी काय, असे विचारले आहे. मात्र अद्याप याचे रहस्य उलगडलेले नाही.