मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने आपल्या विनोदी शैलीने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या एनर्जीचं नेहमी कौतुक केलं जातं. सध्या सिद्धार्थ ‘स्टार प्रवाह’च्या ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या सलग तिसऱ्या पर्वाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ जाधवकडे देण्यात आली आहे. अशातच सिद्धार्थने गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकताच ‘रेडिओ सिटी मराठी’शी संवाद साधला. यावेळी सिद्धार्थ जाधवने ट्रोलिंग विषयी भाष्य केलं. तो म्हणाला, “मराठीचा रणवीर सिंह, याला रणवीर सिंह चावला, गरिबांचा रणवीर सिंह असं मला बोलतात. तर बोलू दे, ठीक आहे. काहीही प्रोब्लेम नाही. आपण त्यांना अधिकार दिला. त्यांनी बोलावं. त्यांचं ते मत आहे. मला माझ्या स्टाइलमध्ये राहायला खूप आवडतं. मी या पद्धतीने कधीच गॉगल, स्पोर्ट्स शूज, गळ्यात चेन या झोनमध्ये नव्हतो.”

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानच्या शोच्या टीआरपीसाठी धडपड, २६९० कोटींची मालकीण शालिनी पासीची घरात एन्ट्री

पुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “मी आताची स्टाइल खरंतर रणवीर सिंहकडूनच घेतली. एकदा ‘सिम्बा’ चित्रपटाच्या सेटवरती एक दादा होते. त्यांच्या व्हॅनिटीमध्ये खूप कपडे होते. त्यात फटाक्यांसंबंधीत काहीतरी सूट होता. मी म्हटलं, दादा आता हे घालायचं? ते म्हणाले, सिद्धू भाई, तुम्हाला जे काही घालावंस वाटेल ते घाला. मला असं वाटतं, कदाचित त्यांना तसं कोणीतरी सांगितलं असेल.”

“माझ्यासाठी ट्रोलिंग हा मुद्दाच नाही. तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. मला जे घालायला आवडतंय, ते घालणार,” असं स्पष्ट सिद्धार्थ जाधव म्हणाला.

हेही वाचा – Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक

हेही वाचा – Bigg Boss 18मधील ‘या’ सदस्याला दारू सोडण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने केली होती मदत, म्हणाला, “त्याने मला एक डायरी दाखवली…”

दरम्यान, सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो अलीकडेच ‘येक नंबर’ चित्रपटातील शीर्षकगीतात दिसला होता. या गाण्यात सिद्धार्थने अभिनेत्री मलायका अरोराबरोबर डान्स केला होता. तसंच सिद्धार्थ ‘एक डाव भुताचा’ चित्रपटात पाहायला मिळाला. लवकरच सिद्धार्थ ‘साडे माडे तीन – २’मध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘गांधी टॉक्स’मध्ये नावाच्या चित्रपटात सिद्धार्थ झळकणार आहे. या चित्रपटात तो विजय सेतुपतिसारख्या सुपरस्टार्सबरोबर दिसणार आहे.