मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ जाधवने मराठीपाठोपाठ बॉलिवूडमध्येही काम करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच सिद्धार्थ जाधवने त्याचं एक मोठ स्वप्न पूर्ण केलं आहे.
सिद्धार्थ हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होताना पाहायला मिळाले. त्याच्या ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ हे चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सिद्धार्थ हा नेहमी त्याच्या चाहत्यांना विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अपडेट देत असतो. नुकतंच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो…” सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली
सिद्धार्थने त्याच्या आई-वडिलांना घर घेऊन दिलं आहे. त्याने त्याच्या घराबाहेरील नेमप्लेटचा फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याची आई मंदाकिनी रामचंद्र जाधव आणि वडील रामचंद्र भागोजी जाधव अशी दोघांची नाव लिहिली आहेत. हा फोटो शेअर करत त्याने आई वडिलांसाठी नवी घर घेतल्याची माहिती दिली आहे.
सिद्धार्थने या फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. स्वप्नपूर्ती…. #आईबाबा. माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण. स्वप्नपूर्तीचा तो क्षण, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
Exclusive Video : ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करणार आहेस का? सिद्धार्थ जाधव म्हणाला, “माझा विचार…”
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकार कमेंट करत त्याचं अभिनंदन करत आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरने सिद्धार्थ जाधवच्या या फोटोवर वाह सिद्धू, भावा असे म्हणत कमेंट केली आहे. तर तेजस्विनी पंडितने बंड्या असे कमेंटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सिद्धार्थ जाधव हा एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे. तो कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. पण त्याने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्याचे स्थान मिळवले आहे. यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.