मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. मराठीमधील टॉपचा अभिनेता म्हणून तो कायमच चर्चेत असतो. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. आता लवकरच तो ‘अफलातून’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याने एक लाईव्ह केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ जाधवने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन घेतलं. यावेळी त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. या इन्स्टाग्राम लाईव्ह वेळी सिद्धार्थ जाधवचा लूक पाहून अनेक जण थक्क झाले.
आणखी वाचा : शशांक केतकरच्या पत्नीला झाला आजार, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हा लवकर…”

सिद्धार्थ जाधवने यावेळी चाहत्यांना त्याचा नवा लूक आणि हेअरकट दाखवला. त्यावरुन त्याला एकाने प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने हो मी आताच हेअर कट केला आहे. कापले बाबा एकदाचे केस, असे गंमतीत म्हटले. यानंतर अनेकांनी त्याला खूप चांगला दिसतोय, असे म्हटले आहे.

त्यानंतर एकाने सिद्धार्थला “केस झाले आता तुम्ही दाढी वाढवा”, असा सल्ला दिला. त्यावर सिद्धार्थने “अरे नाही ना भावा. दाढी वाढतच नाही. एकदा महिनाभर वाढवली होती, एवढीशीच वाढली”, असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

दरम्यान सिद्धार्थ जाधव हा लवकरच ‘अफलातून’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ एका आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ‘श्री’ असे त्याच्या पात्राचे नाव आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav instagram live session talk about his beard and hair cut nrp