अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच सिद्धार्थ ‘अफलातून’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यग्र आहे. चित्रपट, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमात आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या सिद्धार्थला अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याचं पहिलं स्वप्न फार वेगळं होतं. याविषयी त्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : प्रिया बापट – उमेश कामत ९ वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा येणार एकत्र! नव्या नाटकाची घोषणा करत शेअर केली पहिली झलक

सिद्धार्थ जाधवने ‘राजश्री मराठी’च्या ‘त्याची गोष्ट’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने त्याचं पहिलं स्वप्न काय होतं? याविषयी आपल्या चाहत्यांना सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार मी कधीच केला नव्हता कारण, लहानपणापासून माझी एकमेव इच्छा होती की, आपल्याला पोलीस व्हायचंय. त्यासाठी माझी सर्व तयारी सुरु होती. एनसीसी, फुटबॉल अशी सर्व तयारी मी करायचो. नाटक ही केवळ माझी आवड होती. माझं पहिलं स्वप्न वेगळं होतं… मी पोलीस व्हायचंय हेच ठरवलं होतं.”

हेही वाचा : Video : बिडी ओढणाऱ्या मजुरांना पाहून सोनू सूद त्यांच्याकडे गेला अन्…, अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने वेधले लक्ष

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “माझ्या भावंडांपेक्षा माझ्यात आत्मविश्वास जास्त होता. त्यामुळे शिवजयंती, दिवाळी, गणपती उत्सव, आंबेडकर जयंतीनिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी सहभागी व्हायचो. नायगावच्या सरस्वती हायस्कूलमध्ये असताना सुद्धा मी अनेक कार्यक्रमांमध्ये काम केलं. नाटकाचा मी कधीच करिअर म्हणून विचार केला नव्हता. पुढे रुपारेल कॉलेजला गेल्यावर मला नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्यानंतर एकांकिका, व्यावसायिक नाटक या सगळ्या गोष्टी आपोआप जुळून आल्या.”

हेही वाचा : “रेस्टॉरंटमध्ये जायला आवडत नाही”, रणवीर-दीपिका अशी प्लॅन करतात रोमॅंटिक डेट; अभिनेत्री म्हणाली, “आम्ही दोघेही…”

“मी कधीच कोणाकडे मला काम द्या म्हणून गेलो नव्हतो. शाळा-कॉलेजच्या दिवसांपासून मला भूमिका मिळत गेल्या आणि मी हळूहळू सगळ्या भूमिका करू लागलो. यातून आपोआप इंडस्ट्रीकडे वळलो अन्यथा माझं पहिलं स्वप्न पोलीस व्हायचं हेच होतं”, असे सिद्धार्थ जाधवने सांगितले.