मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. मराठीमधील टॉपचा अभिनेता म्हणून तो कायमच चर्चेत असतो. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. आता लवकरच तो अफलातून या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच सिद्धार्थने त्याच्या मोठ्या भावाबरोबरचा खास फोटो पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडिया कायमच सक्रीय असतो. नुकतंच सिद्धार्थने एक पोस्ट पोस्ट केला आहे. या फोटोत सिद्धार्थचा मोठा भाऊ डॉ. लवेश जाधव दिसत आहे. सिद्धार्थ आणि त्याचा मोठा भाऊ हुबेहुब एकमेकांसारखे दिसतात. त्या दोघांचीही हेअरस्टाईलही सेम आहे.
आणखी वाचा : “पोरी मला इच्छामरणही चालेल, पण…” ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे मांडली व्यथा, अंकिता म्हणाली “मी सिनेसृष्टीपर्यंत…”

सिद्धार्थने हा फोटो शेअर करत “बडे मिया, छोटे मिया, डॉ. लवेश, माझा भाऊ” असे म्हटले आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थने लवेश हे माझे प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे.

सिद्धार्थचा हा फोटो पाहून अनेक कलाकार थक्क झाले आहेत. लाफ्टर क्वीन भारती सिंहने ‘दादा’असे म्हणत यावर कमेंट केली आहे. तर अभिनेता उत्कर्ष शिंदेने ‘तुला सर्व काही मिळू दे’, अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

दरम्यान सिद्धार्थ जाधव हा लवकरच ‘अफलातून’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ एका आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ‘श्री’ असे त्याच्या पात्राचे नाव आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav share brother lavesh jadhav photo look same to same caption nrp