सध्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे शंभरावं अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरू आहे. काल, रविवारी या नाट्य संमेलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आटोपून ते मुंबईला निघाले. पण यावेळी वाहनांच्या रांगाच रांगा पाहून राज ठाकरे संतापले. खालापूर टोलनाक्यावर स्वतः गाडीतून उतरून राज ठाकरेंनी अधिकाऱ्याला ठाकरी शैलीत चांगलं सुनावलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंबरोबर या प्रवासात अभिनेता सिद्धार्थ जाधव होता. त्याने एका व्हिडीओतून या घटनेचा विलक्षण अनुभव सांगितला. या व्हिडीओत सिद्धार्थ म्हणाला, “नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर मी पुण्यापासून ते मुंबईपर्यंत प्रवास करत होतो. नाट्य संमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी त्याच्याबरोबरच प्रवास करत होतो. एक्स्प्रेस हायवेवरून खालापूर टोलनाक्याला येताना वाहनांची रांग पाहिली. साहेब स्वतः गाडी चालवतं होते. मी त्यांच्या गाडीत बसलो होतो. साहेबांच्या पोलिसांच्या व्हॅनने त्यांच्या गाडीला रस्ता करून दिला होता. पण ते स्वतः थांबले. आम्हाला काही कळायच्या आत ते गाडीतून उतरले. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावलं. आताच्या आत सगळ्या गाड्या सोडा. कारण चार ते पाच किलोमीटर गाड्यांची रांग लागली होती. त्यात कुठेतरी रुग्णवाहिका अडकली होती, लोकं कंटाळली होती. पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच पटापट गाड्या सोडण्यात आल्या.”

हेही वाचा – “डोळे पाणावले…”, केदार शिंदेंसंबंधित ‘तो’ क्षण पाहून भारावल्या पत्नी बेला शिंदे, म्हणाल्या, “२७ वर्षे…”

पुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “एवढं करून ते गेले नाहीत, तिथे थांबले. रुग्णवाहिका जाईपर्यंत ते तिथेच थांबले होते. मग निघताना साहेबांनी सांगितलं, एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढेही त्याच्याबरोबर प्रवास करताना वाशी टोलनाका असेल किंवा इतर टोलनाक्यांवर थांबून जिथे जिथे वाहतूक कोंडी आहे, तिथे उतरून खडसावून सांगितलं. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. सकाळी नाट्य संमेलनात मी त्यांची मुलाखत पाहिली होती. ज्यामध्ये कलाकारांविषयी ते ज्या आत्मीयतेने गोष्टी बोलत होते, तेही भावलं होतं.”

हेही वाचा – “आयुष्यातला एक….”, ‘बिग बॉस मराठी ४’च्या आठवणीत पुन्हा रमला विजेता अक्षय केळकर, निमित्त होतं खास

दरम्यान, टोल नाक्यांवरील नियमांच्या पायमल्लीवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चाही केली होती. मात्र, अद्यापही टोल प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा अनुभव राज ठाकरे यांना खालापूर टोलनाक्यावर आला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav share experience with raj thackeray at khalapur toll naka pps
Show comments