मराठी चित्रपटसृष्टीत टॉप १० अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. सिद्धार्थ जाधव हा सध्या त्याच्या अफलातून या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच सिद्धार्थने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसांचा फोटो पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ जाधवने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने एक खास फोटो पोस्ट केला आहे. यात सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत हे तिघेजण पाहायला मिळत आहेत. या फोटोला सिद्धार्थने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : सेम टू सेम! सिद्धार्थ जाधव आहे मोठ्या भावाची कार्बन कॉपी, म्हणाला…

“काही माणसं ही आयुष्यात “महत्वापेक्षाही” महत्वाची असतात… lv u forever. सन्नी बबली आदित्य, friends forever”, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

आणखी वाचा : “केस झाले आता दाढी वाढव”, सिद्धार्थ जाधवला चाहत्याचा सल्ला; अभिनेता म्हणाला “एकदा महिनाभर…”

दरम्यान सिद्धार्थच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे. तिने यावर हार्ट इमोजी शेअर केला आहे. सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत या तिघांनी ये रे येरे पैसा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. यातील गाणीही चांगलीच हिट ठरली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav share photo with tejaswini pandit umesh kamat said important people prarthana behere comment nrp