मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो मराठी चित्रपटसृष्टीत टॉप १० अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो आता होऊ दे धिंगाणा २ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. त्याबरोबरच लवकरच तो एका चित्रपटात झळकणार आहे.
सिद्धार्थ जाधवने नुकतंच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींबद्दल विचारण्यात आले. यावेळी त्याला अभिनेत्री सई ताम्हणकरबद्दल रॅपिड फायरमध्ये विचारण्यात आले. त्यावर त्याने मजेशीर शब्दात उत्तर दिले.
आणखी वाचा : “तू स्वत:वर ती वेळ…”, अशोक सराफ यांनी निवेदिता यांना दिला ‘हा’ कानमंत्र
यावेळी त्याला तेजस्विनी पंडितबद्दल विचारले असता त्याने ‘फोकस आणि स्वाभिमानी’ असे म्हटले. त्यानंतर त्याने अमृता खानविलकरला ‘एनर्जी’ असे म्हटले. तसेच ‘काय करायचं तुझ्या एनर्जीचं’, असेही त्याने सांगितले.
यानंतर त्याला प्रिया बापटबद्दल विचारले असता त्याने तो ‘गोड, क्यूट अंम्रे’ असे म्हणाला. याबरोबरच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ‘उत्तम अभिनेत्री’ असे त्याने म्हटले. यानंतर त्याला सई ताम्हणकरबद्दल विचारणा केली असता त्याने ‘बेस्ट आणि वाघीण’ असा उल्लेख केला.
दरम्यान सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर हे दोघेही एकमेकांची चांगले मित्र आहेत. त्या दोघांनी ‘सुंबरान’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘टाईम प्लीझ’ आणि ‘धुराळा’ या चार चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत.