२०१५साली प्रदर्शित झालेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. सुबोध भावेचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. आजही ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात. आता ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे आणखी एक भव्यदिव्य संगीतमय नजराणा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन घेत आहे. ‘संगीत मानापमान’ असं या संगीतमय चित्रपटाचं नाव असून आज अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालं होतं. टप्प्याटप्प्यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आणि अखेर जानेवारी २०२४मध्ये ‘संगीत मानापमान’चं चित्रीकरण पूर्ण झालं. याबाबत सर्व अपडेट सुबोध भावे सोशल मीडियावर सतत देत होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे.

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

हेही वाचा – किशोरी अंबिये यांची लेक ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम? कोण आहे? जाणून घ्या…

अभिनेत्याने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत १ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘संगीत मानापमान’ प्रदर्शित होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. सुबोधने चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “आज मराठी संगीत रंगभूमीवरील एक सोन्याचे पान असलेल्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण झाली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. आजच्या दिवशी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून, सादर करीत आहोत, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित एक संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ १ नोव्हेंबर २०२४, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित.”

हेही वाचा – ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, फलटणमध्ये सुरू केला स्वतःचा ‘हा’ व्यवसाय

दरम्यान, ‘संगीत मानापमान’ या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यामुळे इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. कलाकार मंडळी शुभेच्छा देत असून चाहते हा चित्रपटही हिट होणार असं म्हणताना पाहायला मिळत आहेत.