आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रीतील पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्राबाहेर रांगेत लागले आहेत. मराठी अभिनेता सुबोध भावेने पुण्यात मतदान केल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोध म्हणाला, “मला लोकशाहीने जो हक्क दिलाय, त्यानुसार माझ्या एका मताची किंमत खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे. म्हणून मी मुंबईतून प्रवास करून पुण्यात मतदानासाठी येतो, मग परत मुंबईत जाऊन काम करतो. मी आणि माझी पत्नी मतदान करतो, लवकरच माझा मुलगा १८ वर्षांचा होईल, तोही मतदान करेल. हा लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणुकांचा उत्सव आहे, आपण दिलेल्या मतांच्या आधारे आमदार, खासदार निवडून येतात. आपण मत न दिल्याने काय फरक पडणार आहे, असा निराशावादी विचार करून तुम्ही घरात बसून राहिलात तर त्याने कोणताही बदल घडणार नाही. तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या, जो तुम्हाला योग्य वाटतो, त्याला मत द्या, पण मत द्या. मत वाया घालवू नका.”

Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका

प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी

सुबोधने यावेळी बोगस मतदानाचा उल्लेख केला. “अनेकदा बोगस मतदानाचे प्रकार घडतात. तुमच्याऐवजी दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं. तुमचं नाव आलं नसेल यादीत तर संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा. मतदान हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे जे आपण पार पाडायला पाहिजे. कोणतीही आस्थापना, कोणतीही संघटना, कुठलीही कंपनी तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही. मतदानापासून तुम्हाला कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, आपल्याला योग्य वाटणारा उमेदवारा आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो,” असं सुबोध भावे म्हणाला.

subodh bhave
अभिनेता सुबोध भावेने केलं मतदान (फोटो – सागर कासार, लोकसत्ता प्रतिनिधी)

Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर

फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल विचारलं असता सुबोध म्हणाला, “मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. मला त्याबद्दल शून इंटरेस्ट आहे, पण मला माहित आहे मला कोणाला मतदान करायचं आहे, जे माझं ठरलेलं आहे आणि मला माहित आहे की ते माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे.”

हेही वाचा – अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”

मतदानाची टक्केवारी कमी होतेय, त्यावर सुबोधने लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. “मत द्या, मतदानाचा कंटाळा करू नका. ५-१० मिनिटांचं काम असतं, जाऊन बटण दाबून तुम्हाला मत द्यायचं असतं. टक्केवारी कमी झाल्यास जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाही तो कदाचित निवडून येऊ शकतो. तुम्हाला जर वाटत असेल की बदल घडायला पाहिजे तर बाहेर पडा आणि मत द्या,” असं आवाहन सुबोध भावेने केलं.

Story img Loader