मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात तो काम करताना दिसून आला आहे. लवकरच तो ओटीटी माध्यमातसुद्धा दिसणार आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याआधी चित्रपटाचा संगीत लोकपर्ण सोहळा पार पडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सोहळयात सुबोध भावेने चित्रपटाबद्दल, आपल्या भूमिकेबद्दल सांगितले तसेच चित्रपटातील मानधनाच्या बाबतीत त्याने स्पष्टीकरण दिले आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर करत होता त्याने सुबोधला विचारले ‘या चित्रपटातून तुला मिळालेल्या मानधनाबाबत तू एक वेगळा प्रयोग केला आहेस त्याबद्दल काय सांगशील’? सुबोधने यावर लगेच उत्तर दिले ‘ही गोष्ट जगजाहीर करण्यासारखी नाही. या देशात स्वातंत्र्याची पहिली पहाट कोणी दाखवली असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी, अशा माणसाची भूमिका जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा हेच तुमचे मानधन आहे. जेव्हा निर्मात्यांनी मला या भूमिकेसाठी मानधन दिले तेव्हा मी त्यांना सांगितले हे छत्रपतींच्या भूमिकेसाठी मानधन आहे माझे नाही, त्यामुळे या मानधनाचा उपयोग मी समाजातील उपेक्षित घटकांच्या मदतीसाठी वापरणार आहे’.

“या महाराष्ट्राने मला … ” जेव्हा अमिताभ बच्चन ‘या’ मराठी चित्रपटात झळकले होते

महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने होते. येत्या २५ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी हे कलाकार दिसणार आहेत. अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor subodh bhave donating his films remuneration to neglected people spg
Show comments