एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र असलेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया समोर येताना दिसतात. नुकतंच अभिनेता सुबोध भावेने हा चित्रपट पाहिला.
सुबोध भावे हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो त्याची पत्नी आणि दोन मुलं दिसत आहे. यावेळी त्याने ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “२ तास वेळ काढून…” ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली “९० चा काळ…”
सुबोध भावेची पोस्ट
“काल आम्ही सहकुटुंब ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहिला.
आत्ताच्या काळात या चित्रपटाची किती गरज होती हे वारंवार बघताना जाणवत होतं.
कृपया चुकवू नका. आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पहा! भावांनो अफाट काम आहेत तुम्ही सगळ्यांनी”, असे सुबोध भावेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “शालेय जीवन, प्रेम अन्…” सर्वोत्कृष्ट युथ फिल्म पुरस्कार मिळालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसते. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.