‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर अभिनेता सुबोध भावेचा आणखी एक संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मानापमान’ असं या चित्रपटाच नाव असून भव्यदिव्य संगीतमय नजराणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या संगीतमय चित्रपटाच्या शूटिंग कालपासून सुरुवात झाली आहे. याबाबत स्वतः सुबोध भावेने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे काही व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा – “केस कापणे हा सुद्धा एक टास्क….”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी असं का म्हणाले?

Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Devmanus Fame Kiran Gaikwad and Vaishnavi kalyankar wedding full video out
Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड झाला सावंतवाडीचा जावई, लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर; म्हणाला, “प्रपोज नाही थेट लग्नाची घातलेली मागणी…”
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…
Atul Subhash Case
Atul Subhash Father Video : “माझा नातू जिवंत आहे की… “; अतुल सुभाष यांच्या वडि‍लांनी व्यक्त केली चिंता, मोदी-योगींकडे मागितली मदत
Devmanus Fame Kiran Gaikwad wedding Amarnath Kharade Nikhil Chavan Sumeet pusavale Mahesh Jadhav dance in varat
Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वरातीत मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो

सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटातील गाणी तितक्यात आवडीनं ऐकली जातात. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला गेल्या वर्षी सात वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य साधून सुबोधने ‘मानापमान’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर यंदा या चित्रपटाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.

हेही वाचा – Video: काजोलचा व्हिडिओ काढताना पडला पापाराझी; अभिनेत्रीच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘संगीत मानापमान’ या नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘मानापमान’ या संगीतमय चित्रपटाच्या शूटिंग आता सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत सुबोध भावेने लिहीलं, “अखेर ‘मानापमान’च्या शूटिंगला सुरुवात झाली. ‘कट्यार’नंतर पुन्हा एकदा आमचा संपूर्ण संघ तुम्हाला आनंद देण्यासाठी सज्ज झालाय. पुढचे काही महिने आम्ही पुन्हा एकदा एका सुंदर प्रवासाचे साक्षी होणार आणि पुढील वर्षी दिवाळीला तुम्हालाही आमच्या आनंदात सहभागी करून घेणार. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू दे”

हेही वाचा – “कॅमेराच्या मॉनिटवर साप अन्…” अभिनेता अमेय वाघचा अंदमानमधील चित्रीकरणाचा अनुभव, म्हणाला…

सुबोधला या पोस्टवर प्रतिक्रियेद्वारे कलाकार मंडळीसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. “तुमचे दिग्दर्शन आणि अभिनय नेहमीच आम्हाला बघायला आवडतं..संगीत सुरांच्या मैफलीत गाजणारा हा चित्रपट असेल..याची पण अनेक गाणी मनाला स्पर्श करणारी असेल..गणपती बाप्पा मोरया..खूप खूप शुभेच्छा सर..”, “सुंदर, सुंदर, सुंदर… तुम्हाला व ‘मानापमान’ चित्रपटाच्या सर्व टीमला मनापासून अनंत शुभेच्छा, जय हो..”, “तुमच्या या आनंदमय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आम्हाला पुढच्या वर्षी दिवाळीत मिळणाऱ्या आनंदाची आतुरता… चित्रीकरण पाहून मन अगदी भरून आले”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “हिंदू हा धर्म नाही, ही जगण्याची…,” अध्यात्माविषयी बोलताना मिलिंद गवळींचं वक्तव्य, म्हणाले…

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

दरम्यान, सुबोध भावेच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झालंय की, त्याचा हा नवा संगीतमय चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Story img Loader