हरहुन्नरी, बहुआयामी अभिनेता सुबोध भावे सध्या ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सुबोधसह मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, उमेश कामत, श्रुती मराठे, मधुरा वेलणकर, अतुल परचुरे पाहायला मिळणार आहेत. २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या सुबोध भावे या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहेत.

‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना दिसत आहे. नुकताच सुबोधने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी बातचित केली. यावेळी अभिनेत्याने मोबाइलमध्ये बायको मंजिरीचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे? याचा खुलासा केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”

सुबोधला विचारण्यात आलं होतं की, स्वतःचं नातं छान ठेवायला किंवा तोचतोच पणा येऊ नये यासाठी तू काय बदल केले? आणि चाळीशीतले ते काय बदल होते ज्यामुळे तुझं आणि मंजिरीमधलं नातं कायम छान राहिलं? तेव्हा सुबोध म्हणाला, “बायकोचं ऐकन. ती म्हणते ते खरं आणि अगदी बरोबर आहे, असं आपण ठरवलं की आपलं लग्न, नातं सोप होऊन जातं. लग्नाआधी आई-वडील म्हणतील ते आणि लग्नानंतर बायको म्हणेल ते आपण हो, ओके, बरोबर, असं म्हटलं की सगळं ठीक. यामुळे आपला त्रास वाचतो.”

पुढे अभिनेता म्हणाला, “माझ्या फोनमध्ये मी माझ्या बायकोचं नाव ‘आमचे मालक’ असं सेव्ह केलंय. मालकांना मालक म्हटलं तर नोकरांना, गुलामांना त्यांचं ऐकल्याशिवाय पर्याय काय असतो.”

हेही वाचा – मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चार वर्षांनंतर अमेरिकेहून परतली भारतात, गोदावरीच्या काठेवरील कुटुंबासहचे फोटो व्हायरल

दरम्यान, ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाव्यतिरिक्त सुबोध भावे बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सुबोध भावे अभिनेत्री रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहेरेसह देखील एका चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader