आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकार विविध पोस्ट शेअर करताना पाहायला मिळत आहेत.
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून अभिनेता सुबोध भावेला ओळखले जाते. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोध भावेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Video : साईशा भोईरचा ‘नवा गडी नवा राज्य’ मालिकेला रामराम, ‘ही’ बालकलाकार झळकणार ‘चिंगी’च्या भूमिकेत, प्रोमो समोर
यात सुबोध भावेने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा पाहायला मिळत आहे. यावेळी सुबोध भावे हा तिथे जाऊन नतमस्तक झालयाचे पाहायला मिळत आहे.
सुबोध भावेची पोस्ट
आज गुरूपौर्णिमा,
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला त्या वास्तूला भेट देण्याचा योग आला.
स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला त्या पवित्र वास्तूच आणि आई जिजाऊं यांचे आशिर्वाद घेता आले.
आई जिजाऊ आणि कळत-नकळत संस्कार करणार्या सर्व गुरूंना मनापासून वंदन आणि साष्टांग नमस्कार, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अशा कमेंट करत सुबोधला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सर आमच्या जिल्ह्यात स्वागत आहे तुमचं, अशी कमेंट केली आहे.