मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अशातच त्याने एका पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुबोधने आपल्या पोस्टमधून आगामी चित्रपटाची झलक दाखवली आहे. ज्यात त्याच्या एका हातात अगरबत्ती आणि एका हातात वेफर्स आणि तो वरती बघत आहे असे मोशन पोस्टर आहे. ‘वाळवी’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव असून परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याने पोस्टमध्ये कॅप्शन दिला आहे की, “एका हातात अगरबत्ती आणि एका हातात वेफर्स, सुबोध भावे नक्की करतोय तरी काय?” त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटात सुबोधच्या बरोबरीने स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे आदी कलाकारांचे लूक समोर आले आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ का अशा वेगवेगळ्या धाटणींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ पासून प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओने चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.