गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता लवकरच अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला फुलराणी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच अभिनेता सुबोध भावेने प्रियदर्शनीबद्दल भाष्य केलं आहे.

सुबोध भावेने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला प्रियदर्शनीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? हे विचारण्यात आले. त्यावर त्याने “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो”, असे वक्तव्य केले. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ अभिनेत्रीचं नशिब उजळलं, सुबोध भावेबरोबर करणार बहुचर्चित मराठी चित्रपट, टीझर पाहिलात का?

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

“फुलराणी या चित्रपटात माझं पात्र काय असणार हे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. त्यावेळी प्रियदर्शनीचं कास्टिंग झालं नव्हतं. त्यावेळी कोणती अभिनेत्री माझ्याबरोबर काम करणार याची माहिती नव्हती. त्याने मला काही फरकही पडत नव्हता.

प्रियदर्शनीला मी पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर भेटलो. तोपर्यंत मी तिला ओळखत नव्हतो. ती महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत काम करते हे मला कळलं होतं. पण मी जे एपिसोड पाहिले होते त्यात ती नव्हती. त्यामुळे मला त्यातली प्रियदर्शनी नेमकी कोण हेच कळत नव्हतं, असे सुबोध भावे म्हणाला.

पण आता तिचं काम पाहिल्यावर काही बोलायची गरज नाही. ती फार सुंदर काम करते. ती फार समजून उमजून काम करणारी अभिनेत्री आहे. खूप वर्षांनी इतकी विचार करणारी, सशक्त आणि कोणत्याही प्रकारचं काम करणारी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली. पुढच्या काही वर्षातील सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचं नावं आहे. तसेच तिच्यासाठी तिचं नाव डोक्यात ठेवून व्यक्तिरेखा लिहिल्या जातील”, असेही सुबोध भावेने सांगितले.

आणखी वाचा : “ठाण्यात घोडबंदर रोडला…” ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर पोहोचण्यासाठी कलाकारांना होतोय प्रचंड त्रास, पोस्ट चर्चेत

दरम्यान या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. येत्या २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader