अभिनेता सुबोध भावे सध्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज, २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात सुबोधसह तेजश्री प्रधान, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, उदय नेने, संजय खापरे, प्रदीप वेलणकर अशी बरीच तगडी कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी तो लग्नसंस्थेविषयी आपली परखड मत मांडताना पाहायला मिळत आहेत. ‘तारांगण’ युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना लग्नसंस्थेबाबत सुबोध भावे स्पष्ट बोलला. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”

सुबोध भावे म्हणाला, “लग्न ही कायमचं ज्वलंत समस्या होती. कदाचित तिच्या उगमापासूनच. कारण ती कालानुरुप इतकी बदलत गेली, त्याचं स्वरुप बदलत गेलंय की ते आताच्या काळापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे ती सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे त्याची सोपी उत्तर मिळतील याची अपेक्षाही करू नये. दोन माणसांनी आयुष्यभर एकत्र राहणं, एका व्यक्तीने आपलं सगळं सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर कायम एकत्र राहणं, ही अवघड गोष्ट आहे. ही मुलाला कदाचित सोपी वाटते. कारण त्याला हे करायला लागतं नाही. पण, मुलीला हे करायला लागतं. तिच्या आई-वडिलांना सोडून, तिचं घर सोडून, सगळ्या माणसांना, मित्रांना मागे सारून एक वेगळ्या घराला स्वतःचं समजायला लागतं. तिथे राहायला लागतं. स्वतःचं नाव बदललायला लागतं. स्वतःच्या आवडीनिवडी बदलाव्या लागतात. त्यामुळे तिच्या त्यागाची गोष्ट खूप मोठी आहे. त्याला काहीच करायला लागतं नाही.”

हेही वाचा – Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर

“तर इतकी सोपी लग्नसंस्था कधीच नव्हती. त्याच्यावरती कायम वेगवेगळ्या पद्धतीने मग काय अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, कधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जे काही म्हणायचं आहे. म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला गेला आणि तो चालू राहिलं. लग्न या विषयावर माझा काही इतका तांडगा अभ्यास नाही की त्याच्यावर मी काहीतरी बोलू शकतो. पण जेव्हा जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्याच्यातून एकमेकांना आनंद देण्याचा, आनंद शोधण्याचा, एकमेकांना आदर देण्याचा, प्रेम देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कुठलीही संस्था यशस्वी होते. आनंद आणि प्रेम काढून घेतल्यानंतर कुठलीच संस्था यशस्वी होत नाही,” असं सुबोध भावे स्पष्टचं म्हणाला.

हेही वाचा – ‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”

दरम्यान, सुबोध भावेच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट १० जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट सुबोध भावेने दिग्दर्शित केला आहे. ‘संगीत मानापमान’ चित्रपटात सुबोधसह वैदेही परशुरामी, सुमित राघवन, उपेंद्र लिमये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात १४ गाणी आहेत. आतापर्यंत काही गाणी प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत.

Story img Loader