दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. नुकतंच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने शुभेच्छा दिल्या आहेत.
सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने महाराष्ट्राचा नकाशा असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सुबोधने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुबोध भावेची पोस्ट
स्व – कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या व्यक्तींना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या या पवित्र आणि मंगल अशा भूमीला त्रिवार वंदन
“महाराष्ट्र दिनाच्या ” मनपूर्वक शुभेच्छा. कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, असे सुबोध भावेने दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते.
या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जात होते.