आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं, तिला चांगला जोडीदार मिळावा असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. आपल्या मुलीला योग्य जोडीदार मिळाला की आई-वडिलांना सर्वाधिक आनंद होतो. असंच काहीसं आता अभिनेते सुनील तावडे यांच्याबाबतीत घडताना दिसत आहे. सुनील यांची लेक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्याच लग्नाची सध्या जोरदार तयारी ते करत आहेत.

आणखी वाचा – Video : मित्राच्या गाडीने फिरणाऱ्या शिव ठाकरेचं आणखी एक स्वप्न पूर्ण, खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत आहे तब्बल…

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

अंकिता असं सुनील यांच्या मुलीचं नाव आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली आहे. शिवाय हळदीचीही तयारी सुरू आहे. सुनील यांचा लेक अभिनेता शुभंकर तावडे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे बहिणीच्या लग्नाचे विविध व्हिडीओ व फोटो पोस्ट करत आहे. तर सुनील यांनीही काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुनील हे तिच्या होणाऱ्या पतीबरोबर डान्स करताना दिसत आहेत. संगीत कार्यक्रमाच्या तयारीदरम्यानचा हा व्हिडीओ आहे असं बोललं जात आहे. पण या व्हिडीओमध्ये सुनील अगदी आनंदाने डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “शस्त्रक्रिया…”

सुनील यांची मुलगी अंकिताचाही कलाक्षेत्राशी संबंध आहे. ती स्टार प्रवाह वाहिनीचं वरिष्ठ निर्माती म्हणून काम पाहते. तर शुभंकरही अभिनयक्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहे. सुनील सध्या लेकीच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. आज अंकिताच्या हळदीचा कार्यक्रम आहे. शुभंकरने मंडपाचा फोटो व हळदीच्या तयारीबाबत फोटो पोस्ट करत माहिती दिली होती.

Story img Loader