अभिनेता सुव्रत जोशी त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक नाटकं, मालिका, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केलंय. आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. सुव्रतने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
“…म्हणून आम्ही मुलीचं नाव ज्युलिया ठेवलं,” ‘बाईपण भारी देवा’मधील मराठमोळ्या सुकन्या मोनेंचा खुलासा
“तुमची राजकीय चिखलफेक चालू देत, तुमच्या कुणाकडूनही काही विधायक, प्रबोधनपर असे अपेक्षित नाहीच. आता कुणाविषयी प्रेम अथवा आदरदेखील वाटत नाही परंतु आपापसात भांडताना वर्षानुवर्षे ज्या बुरसटलेल्या धारणांनी समाजातील एका गटाला वंचित ठेवले, त्यांचे पिडन केले, किमान त्या धारणा बळकट होणार नाहीत, काही छुपे चुकीचे संदेश जाणार नाहीत ही काळजी तरी घ्या,” अशी स्टोरी सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या स्टोरीतून त्याने तृतीयपंथियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल भाष्य केलंय.
या स्टोरीचा संदर्भ त्याने आधी शेअर केलेल्या स्टोरीशी आहे. ती पोस्ट खालीलप्रमाणे –
दरम्यान, सुव्रतने त्याच्या पोस्टमधून तृतीयपंथियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल, शोषणाबद्दल राजकीय नेत्यांवरवर टीका केली आहे. ज्यांना वर्षानुवर्षे वंचित ठेवलं गेलं, त्याच धारणा आता तरी बळकट होणार नाही, याची राजकारण्यांनी काळजी घ्यावी, असं सुव्रतने म्हटलं आहे.