मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून अभिनेता सुयश टिळकला ओळखले जाते. आतापर्यंत तो विविध नाटक, मालिका, चित्रपटात झळकला आहे. आता लवकरच सुयश टिळक हा एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुयश टिळक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुयशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक लूक करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “नवीन आव्हानात्नक भूमिका”, असे कॅप्शन त्याने याला दिले आहे.
आणखी वाचा : निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्यानंतर जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला “अभी तो पार्टी…”

सुयश टिळक हा स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ मालिकेत झळकणार आहे. सुयश टिळक हा सचित राजेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याच्या या भूमिकेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

आणखी वाचा : “मी त्यांची माफी मागतो आणि…”, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनय बेर्डेचे स्पष्टीकरण, म्हणाला…

दरम्यान सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची खूप चर्चा आहे. अंकुशच सचित राजे असल्याचं भासवलं जात असलं तरी खरा सचित राजे मात्र दुसराच आहे. या मालिकेत आता खऱ्या सचित राजेची एण्ट्री होणार आहे. अभिनेता सुयश टिळक सचित राजेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor suyash tilak enter in aboli serial share first look video nrp