छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. आओ ना फिर म्हणतं स्वप्नीलनं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या स्वप्नील जोशी काही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण अशातच त्याचा एका अभिनेत्रीबरोबर लंडनमधील ब्रीजवरील रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही…”; ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या मुलीची शाळा आहे फारच खास

अभिनेता स्वप्नील जोशी काही दिवसांपूर्वी ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. या चित्रपटात स्वप्नीलबरोबर सात अभिनेत्री पाहायला मिळणार आहेत. याच सात अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री दीप्ती देवीबरोबरचा स्वप्नीलचा लंडनच्या ब्रीजवरील रोमान्स करतानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “माझा बुंगरी…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा सेटवरील पाहा खास मित्र

हा व्हिडीओ दीप्ती देवीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. “जहां दोस्तों ने मिलकर लाई है ये बहार,” असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे. तसेच पुढे दीप्तीनं लिहीलं आहे की, “स्वप्नील तुझ्याबरोबर शूटिंग करताना अजिबात भीती वाटत नाही आणि खूप कम्फर्टेबल असतं.”

हेही वाचा – Video: किरण मानेंचा ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “लाडक्या…”

हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा

दरम्यान, स्वप्नील जोशीच्या ‘इंद्रधनुष्य’ या आगामी चित्रपटामध्ये दिप्ती देवी व्यतिरिक्त प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील, सागर कारंडे अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. तसेच स्वप्नील ‘जिलबी’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात स्वप्नील, प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वेबरोबर दिसणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor swapnil joshi and deepti devi romantic video viral on social media pps