काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ आणि लवकरच प्रदर्शित होणारा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन वादही निर्माण झाला आहे. नुकतंच या प्रकरणावर अभिनेता स्वप्निल जोशीने थेट वक्तव्य केले आहे.

अभिनेता स्वप्निल जोशीने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतले. यावेळी स्वप्निलने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्याला एकाने मराठी ऐतिहासिक चित्रपटांबद्दल विचारले. मराठीत होणारे controversy मुळे इतिहास विषयी चित्रपट आगमी काळात कमी होतील का? निर्माते ह्यापासून दूर होईल अशी लोकांना भीती आहे ? मागे ठाण्यात प्रेक्षकासोबात झाल्यानंतर मराठी कलाकार फार गप्प का होते ? असे प्रश्न स्वप्निल जोशीला विचारण्यात आले.
आणखी वाचा : “माझ्यासाठी तोच विजेता…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारताच मराठी अभिनेत्याचे थेट उत्तर

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Anees Ahmed Congress, Anees Ahmed, Congress,
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा बंडाचा झेंडा? पक्षाच्या जातीय गणितावर थेट टीका, म्हणाले…
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
Loksatta article Justice Dhananjay Chandrachud out of court statement
न्याय की देवाचा कौल?
Thrissur Pooram fireworks ie
केरळमध्ये भाजपाचा चंचूप्रवेश होताच स्थानिक उत्सवात हस्तक्षेप? त्रिशूर पूरम वाद काय आहे?
nirmalatai vitekar
पाथरी मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ जुनाच सत्तासंघर्ष नव्या रूपात

त्यावर स्वप्निल जोशीने स्पष्टपणे उत्तर दिले. वादात पडणं हे माझ्या डीएनएमध्ये नाही. म्हणून ते आवडत नाही, असे स्वप्निल जोशी म्हणाला. त्याचे हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “हर हर महादेव बघायला जाताना भीती…” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केला होता. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले.

त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाल्याचे समोर आले होते.