मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. तो मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत विविध नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केले आहे. आता स्वप्नील जोशीने त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

स्वप्नील जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. स्वप्नील जोशीने नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘नाच गं घुमा’ असे त्याच्या मराठी चित्रपटाचे नाव आहे.
आणखी वाचा : “नाचणीची भाकरी, मच्छी फ्राय अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने चुलीवर बनवलं जेवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड

“काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं ! कदाचित म्हणूनच हे धाडस ! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे ! आईचा आशीर्वाद आहेच ! तुमचा ही असुद्या !

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत… आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा.. ‘नाच गं घुमा’. भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

याबरोबरच त्याने या चित्रपटाचा एक टीझर व्हिडीओही शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’, ‘आत्मपॅम्प्लेट’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

आणखी वाचा : Video : मायरा वायकुळने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, ‘या’ एका कृतीने वेधलं लक्ष

हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दरम्यान स्वप्नील जोशीच्या या पोस्टनंतर अनेक जण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Story img Loader