छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. आओ ना फिर म्हणतं स्वप्नीलनं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

हेही वाचा- “आताच्या काळात…”, ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर सुबोध भावेची प्रतिक्रिया, म्हणाला “कृपया…”

"Black Or White, Virgin Or Not": Bengaluru Auto's Gender Equality bengaluru auto driver written a message on back side of his auto goes viral
“महिला ही व्हर्जीन…” रिक्षा चालकानं रिक्षाच्या मागे लिहला विचित्र मेसेज; PHOTO पाहून तुम्हीच सांगा तुम्हाला हे पटलं का?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
how to identify whale vomit
व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात? बाजारात कोट्यवधीत विकल्या जाणार्‍या उलटीचा कशासाठी वापर केला जातो?
Mumbai Rains: Scary Video Showing Huge Monitor Lizard Casually Crawling In Goregaon East
मुंबईकरांनो सावध राहा! पावसामुळे रस्त्यांवर फिरतेय घोरपड, व्हायरल VIDEO पाहून व्हाल थक्क
tupperware bankrupt
Tupperware bankruptcy: अमेरिकन महिलांमुळे टपरवेअरचे नाव पोहोचले सर्वतोमुखी; त्यामागची गोष्ट जाणून घ्या
Vicky kaushal tauba tauba song video the old age home old ladies danced on the song tauba tauba vicky kaushal
‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच
open ai new ai model
माणसाप्रमाणे विचार करणारं AIचं नवं मॉडेल; नोकऱ्यांवर गदा आणणार का?
balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल

सध्या स्वप्नील त्याचा अगामी चित्रपट ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. दरम्यान स्वप्नीलने शुटींगनंतरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थना बेहरे, सुकन्या मोने, आदिती सारंगधर भर रस्त्यात खळखळून हसताना दिसत आहेत. लंडनमध्ये कडाक्याची थंडी आहे. थंडीमुळे सगळ्यांचे पाय गारठले होते त्यामुळे सगळ्यांनाच चालताना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- “तो वेडा आहेच, पण…” परेश मोकाशींच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “आम्ही नवरा-बायको…”

स्वप्नीलने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे. “काय बोलतोय ते बेसिक आहे; पण किती आनंदी आहोत ते दृष्ट लागण्या सारखं आहे !खूब जमेगा रंग जब मिल बैठे कुच यार….लंडन मधे एका संध्याकाळी कुडकुडणाऱ्या थंडीत, पाय गारठलेले असताना, packup नंतर जेवायला गेलो आणि इतके हसलो, इतके हसलो की आयुष्य वाढली ! निखळ मित्र; निखळ मैत्री; निखळ हास्य…बस अजून काय लागतं !”

‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटात स्वप्नील बरोबर दिप्ती देवी, प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील, सागर कारंडे अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. तसेच स्वप्नील ‘जिलबी’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात स्वप्नील, प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वेबरोबर दिसणार आहे.