मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी आहे. स्वप्नीलनं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने दमदार काम केलं आहे. सध्या स्वप्नीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

काही दिवसांपूर्वी स्वप्नील ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. एक पुरुष आणि सात बायकांच्या कथानकावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नील सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील यांच्याबरोबर झळकणार आहे. नुकताच तो या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून भारतात परतला. यावेळी त्याच्या मुलांनी त्याच स्वागत केलं. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता; जो चांगलाच चर्चेत आला होता.

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेच्या गाडीत भररात्री रंगली शेरो-शायरीची बैठक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “भाऊ कदम…”

त्यानंतर आता स्वप्नीलनं एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबर त्यानं “…अशी बायको सगळ्यांना मिळो,” असं कॅप्शन लिहीलं आहे. स्वप्नीलच्या या मजेशीर व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हसण्याचे इमोजी चाहत्यांनी प्रतिक्रियेत दिले आहेत.

हेही वाचा – Video: “माय आता भेटत नाही…”; आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक

हेही वाचा – “बुरखा घालायला हवा होता?” अभिनेत्री रुचिरा जाधव ट्रोल करणाऱ्यावर भडकली, नेमकं काय घडलं?

दरम्यान, स्वप्नीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘इंद्रधनुष्य’ व्यतिरिक्त तो ‘जिलबी’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात स्वप्नील, प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वेबरोबर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी स्वप्नील शिवानी बरोबर ‘वाळवी’ या चित्रपटात दिसला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor swapnil joshi share funny video on social media pps