मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून अभिनेता स्वप्निल जोशीला ओळखले जाते. तो मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत विविध नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केले आहे. स्वप्निल जोशी हा कायमच त्याची मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. नुकतंच स्वप्निल जोशीने प्रेमाची व्याख्या काय? याबद्दल सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वप्निल जोशीने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला प्रेमाबद्दल तुझं मत काय? तुझी प्रेमाची व्याख्या काय? याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने भाष्य केले.
आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

“माझ्यासाठी प्रेम म्हणजे आदर. तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता याच्यासाठी माझा मापदंड आहे तो म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा किती आदर करता. तुम्ही त्याला किती मान देता, किती सन्मान देता. तुम्ही त्याला तुमच्या बाजूला बसवता का? का मग एक पायरी खालची देता किंवा दोन पायऱ्या खालच्या देता. तुम्ही त्याला किंवा तिला किती आदरपूर्वक वागवता. माझ्यासाठी प्रेम म्हणजे आदर आहे”, असे स्वप्निलने सांगितले.

“जर तुम्ही त्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर तुम्ही त्या व्यक्तीवर कधीच प्रेम करु शकत नाही. जर तुम्ही त्याचा आदर केलात तर तुम्हाला प्रेमाची गरज नाही. मग ती समोरील व्यक्ती तुमच्यावर मनापासून भरभरुन प्रेम करेल”, असेही त्याने म्हटले.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान अभिनेता स्वप्निल जोशी काही दिवसांपूर्वी ‘वाळवी’ या चित्रपटात झळकला होता. यात त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.