मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघांना एकत्र पाहिलं की त्यांचे चाहते त्यांना ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ असे म्हणतात. नुकतंच उमेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने नवऱ्याची व्यथा मांडली आहे.
उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. उमेशने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मी बायोपिकसाठी खूप वाट पाहिली”, अंकुश चौधरीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “प्रत्येक वेळी सुबोधच…”
या व्हिडीओत उमेश हा कॉफी बनवताना दिसत आहे. तो कॉफी पावडर, दूध टाकून ती कॉफी बनवतो आणि त्यानंतर प्रियाला दोन वेळा आवाज देत कॉफी तयार असल्याचे सांगतो. ‘प्रिया कॉफी’, असेही तो एकदा बोलतो. मात्र प्रिया बापट काहीही प्रतिक्रिया देत नाही.
त्यानंतर उमेश ‘कॅपेचिनो फॉर प्रिया’ असे बोलतो. त्यानंतर ती लगेचच ‘आले’ असा आवाज देते. यावर उमेश हा चिडतो. त्याने या व्हिडीओवर “सारखं कॅफेमध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणाऱ्या नवऱ्याची कथा”, असे लिहिले आहे.
आणखी वाचा : “एक व्यक्ती हा…”, उमेश कामत आणि प्रिया बापट सांगितले सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य
विशेष म्हणजे त्याने शेअर केलेल्या व्हिडीओलाही त्याने भन्नाट कॅप्शन दिले आहे. “घराचा कॅफे केलाय बाईंनी, (माझ्या बायकोला आवडते माझ्या हातची कॉफी, हीच मला मिळालेली खरी ट्रॉफी)”, असे कॅप्शन उमेश कामतने या व्हिडीओला दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.