संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. सध्या या चित्रपटात झळकलेले अभिनेते उपेंद्र लिमये यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. या चित्रपटावर त्यांच्या लेकाची प्रतिक्रिया काय होती? ‘अ‍ॅनिमल’मधील भूमिका स्वीकारल्यानंतर काय वाटतंय? याविषयी नुकतेच उपेंद्र लिमये म्हणाले.

अभिनेते उपेंद्र लिमये यांनी ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी नुकताच संवाद साधला. यावेळी त्यांना विचारलं गेलं की, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील हे पात्र साकारण्याचा तुम्ही निर्णय घेतला तेव्हा आणि आता किती भारी वाटतंय? ‘माझा हा निर्णय चांगला होता’, असं वाटतंय का? यावर उपेंद्र लिमये म्हणाले, “हाच प्रश्न माझा मुलगा विचारतो. बाबा तुला काही करायचं नव्हतं. तुला जाम पश्चाताप झाला असताना जर तू असं केलं असतंच तर वगैरे वगैरे…पण चित्रपटाची मीटिंग झाली आणि ज्यापद्धतीने कथा सांगितली तेव्हाच तयार झालो होतो. मला लक्षात आलं की, फक्त तोच सीन नाहीये. जरी तो असेल तरी साडे तीन पानाचा तो सीन होता. ज्यामध्ये दोन लोक इतर वाक्य बोलतात बाकी सर्व मी बोलतोय. नाहीतर हिंदीमध्ये कसं असतं… अत्यंत धाडसाने मी हे विधान इथेपण करतोय, बॉलीवूडचे कलाकार जे स्टार म्हणून आहेत किंवा स्टार म्हणून स्वतःच्या प्रेमात आहेत ना ते या सीनचा विचार पण करणार नाहीत. त्यांना दुसरा कोणीतरी वर्चस्व करतोय, दुसरा कोणीतरी आपल्यापेक्षा भाव खाऊ जातोय, हे त्या स्टार लोकांना अजिबात आवडत नाही. अगदी मनापासून सांगायचं झालं, तर हा स्टार आणि अभिनेत्यामधील फरक आहे.”

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pushkar jog angry over ranveer allahbadia controversial statement
“त्या शोमध्ये अश्लील, अचरटपणा…”, समय रैनावर मराठी अभिनेता भडकला! रणवीर अलाहाबादियाबद्दल म्हणाला, “ही कॉमेडी…”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”

हेही वाचा – Video: अखेर ‘तो’ क्षण आलाच! मुक्ता-सागरच्या मेहंदी सोहळ्यात सई आली अन्…; सगळेच झाले भावुक

पुढे उपेंद्र लिमये म्हणाले, “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला म्हणालो होतो की, तू मला खूप आवडतोस. असं नाही की तू स्टार आहेस म्हणून. काही चांगले स्टार आणि अभिनेते आहेत, त्यापैकी तू एक आहेस. यावर रणबीरने माझे आभार मानले होते. अजिबात अहंकार नसणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणबीर आहे. त्यामुळे मीटिंगचं केली नसती आणि हा चित्रपट केला नसता तर फार वाईट वाटलं असतं. पण अल्टीमेटली संदीपची मीटिंग झाली आणि त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मुख्य म्हणजे वेळेचं गणित जुळून आलं. माझ्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या दोन शेड्यूलच्या गॅपमध्ये त्यांनी बरोबर काम करून घेतलं.”

Story img Loader