रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. या सुपरहिट चित्रपटात १० मिनिटांची भूमिका करून अभिनेते उपेंद्र लिमये चांगलेच भाव खाऊ गेले आहेत. त्यांच्या कामाचं चहूबाजूने कौतुक केलं जात असून सोशल मीडियावर त्यांचा सीन व्हायरल झाला आहे. सध्या उपेंद्र लिमये विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच अभिनेते उपेंद्र लिमये यांनी ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारलं गेलं की, सोशल मीडियावर तुमच्या सीनचे व्हिडीओ व्हायरल झालेत? याविषयी तुम्हाला काय वाटतं? यावर उपेंद्र लिमये म्हणाले, “बरेच मीम्स, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शेकडो लोकं सारख ते पाठवतायत. आपल्याकडच्या लोकांना खूप वेळ आहे. जे व्हिडीओ, मीम्स येतायत, ते बघून फक्त हसायचं बसं.”

हेही वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर उपेंद्र लिमयेंच्या लेकाची होती ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला, “बाबा तुला…”

त्यानंतर उपेंद्र लिमयेंना विचारलं की, सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय नाहीयेत? तर तुम्हाला काय वाटतं? यावर अभिनेते म्हणाले, “मी सोशल मीडियावर सक्रिय नाहीये, याबाबत अजिबात खंत वाटतं नाहीये. हिंदीमध्ये काही भूमिकांचं कास्टिंग सोशल मीडियावरील फॉलोअर्स किती आहेत, याच्यावर होतं. तर अशा बसमध्ये मी कधी बसणारच नाही. कारण असं नाही होऊ शकत. सोशल मीडियावरील फॉलोअर्सवर जर मी अभिनेता बरा ठरणार असेल तर मी अभिनयाच दुकानाच बंद करायला पाहिजे. मला सोशल मीडियाविषयी राग अजिबात नाहीये. हे माध्यम वापरण्याचे संस्कार दुर्दैवाने आपल्याकडे झालेले नाहीयेत. त्याच्यातून नकारात्मकता जास्त तयार होते. एवढंच माझं म्हणणं आहे. जे खूप छान पद्धतीने वापरतात. त्यांना माझा सलाम आहे. मला राग कुठल्याच गोष्टीचा नाहीये. मला ते झेपत नाही म्हणून मी थोडासा लांब आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor upendra limaye talk about social media pps